‹ मुख्य पान मांजरा ग्रुप

गोपनीयता धोरण

शेवटचा बदल : १८ सप्टेंबर २०२६

थोडक्यात

ऑर्डर पूर्ण करण्यासाठी लागते तेवढीच माहिती आम्ही घेतो. ती कोणालाही विकली जात नाही आणि जाहिरातीसाठी दुसऱ्याला दिली जात नाही.

कोणती माहिती घेतो

  • ऑर्डरसाठी : नाव, मोबाईल नंबर, निवडलेले पदार्थ आणि तुम्ही लिहिलेली सूचना.
  • अभिप्रायासाठी : नाव, गुण (रेटिंग) आणि तुम्ही लिहिलेला मजकूर. मोबाईल नंबर ऐच्छिक आहे — तो न देताही अभिप्राय देता येतो.
  • तांत्रिक : गैरवापर आणि खोटे अभिप्राय थांबवण्यासाठी IP पत्त्याचा एक सांकेतिक ठसा (hash) थोडे दिवस ठेवला जातो. मूळ IP पत्ता साठवला जात नाही.

पैशांची माहिती

ऑनलाइन पैसे Razorpay या नोंदणीकृत पेमेंट गेटवेमार्फत भरले जातात. तुमचा कार्ड नंबर, UPI PIN, नेट-बँकिंग पासवर्ड या गोष्टी आम्हाला दिसत नाहीत आणि आम्ही साठवत नाही. आमच्याकडे फक्त "पैसे मिळाले / मिळाले नाहीत" एवढीच नोंद येते.

माहिती कशासाठी वापरतो

  • ऑर्डर तयार करून तुमच्या हातात देण्यासाठी.
  • ऑर्डर कोणाची आहे हे काऊंटरवर ओळखण्यासाठी, आणि काही अडचण आल्यास संपर्क करण्यासाठी.
  • हिशेब आणि कराच्या नोंदी ठेवण्यासाठी (कायद्याने आवश्यक तेवढा काळ).
  • तुम्ही अभिप्राय दिला असेल तर तो — तुमच्या नावासह — वेबसाइटवर दाखवण्यासाठी. मोबाईल नंबर कधीही वेबसाइटवर दाखवला जात नाही.
  • तुम्ही "ऑफर हव्या आहेत" असं निवडलं असेल, तरच अधूनमधून ऑफरची माहिती पाठवण्यासाठी.

कोणाला दिली जाते

फक्त ऑर्डर पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्यांना : हॉटेलचं किचन व काऊंटर, आमची बिलिंग यंत्रणा (Petpooja) आणि पेमेंट गेटवे (Razorpay). कायद्याने मागणी झाल्यास संबंधित सरकारी यंत्रणेला. याखेरीज कोणालाही नाही.

तुमचे हक्क

तुमची माहिती बघायची, दुरुस्त करायची किंवा काढून टाकायची असल्यास hotelmanjara10@gmail.com वर लिहा किंवा ९९३३३३५१८२ वर फोन करा. हिशेबासाठी कायद्याने ठेवाव्या लागणाऱ्या नोंदी वगळता उरलेली माहिती आम्ही काढून टाकतो.

तुमचा अभिप्राय वेबसाइटवरून काढून टाकायचा असल्यासही याच मार्गाने कळवा — तो काढून टाकला जाईल.